Tuesday 24 July 2012

मैत्रीच नात स्‍वीकारसील का........!


आज त्‍या कविला 

मला काही सांगायच हे, 
की, 
मी बोललेल्‍या प्रेत्‍येक शब्‍दाची 
मला माफी मागायची हे. 

काल रात्री त्‍याने कदाचित 
मजबुरीत नाव सांगीतले असेल, 
नाव सांगतांना देवाकडून 
माझ्यासाठी मनातल्‍या मनात 
वाईटही मागीतले असेल. 

कदाचित त्‍याला 
माझा रागही आला असेल, 
पण मी बोंल्‍याचे प्रायचीत करतांना 
त्‍याला माझ्या डोळ्यात दीसेल. 

जर त्‍योने मला माफ केले 
तर त्‍याच्‍या कडुन काही मागायच हे, 
दुसर नको 
पण माझी मैत्री आवडेल का 
एवढच सांगायच हे. 

त्‍याच्‍या सुख दुःखात 
मला सहभागी व्‍हायच हे, 
गेल्‍या चार दीवसाच्‍या या 
विना नावी नात्‍याला 
मैत्रीच नाव द्यायच हे. 

माझा मित्र मस्‍त 
एकदम फ्री असावा, 
मला त्‍याचे दुःख 
सांगणारा असावा, 
माझ्याशी मैत्री करतांना 
कुठल्‍याही मजुबुरीत नसावा. 

सांगतोमी  त्‍याला.... 
मनाला मुळीच कोसायचे नाही, 
मजबुरीत माझी मैत्री 
मुळीच स्‍वीकारायची नाही. 

आता त्‍याच्‍या वाटेवर 
मी नजर वाहीन, 
त्‍याच्‍या उत्‍तराची 
मी वाट पाहीन. 
त्‍याच्‍या उत्‍तराची 
मी वाट पाहीन. 

No comments:

Post a Comment