Wednesday 4 July 2012

marathi maitri kavita

"आयुष्यात स्वतःची एक,मैत्रीण असावी."
कुठलाही शिष्ठ पणा न करता,दिल खुलास असावी,
पळस पानी थेम्बा सारखी,ती नितळ असावी;
जी कायम अबोध बालका सारखी,हसत असावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिच्या सोबत संध्याकाळ,एक "स्पेशल" असावी,
पण ती स्वतःकायम,"सोशल"असावी;
मैत्री नात्यात "नथिंग ओफ़िशिअल "असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिची चाहूल एक, ऋतू पालवी सारखी असावी,
जिची सोबत श्रावण-सरी,ओली असावी,
जिच्या केस घसरणीत,पानगळ असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिच्या नाती,सर्व धागी अतूट असावी,
जिची हास्य खळखळ,बेछूट असावी;
जिची मन भावना,रेशीम कोमल असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिच्या वागण्यात,दाणगट पोट्टे-शाही असावी,
कायम माझ्या करिता,शिवी-गाळ असावी;
दोघां मध्ये एक,आगळीच फिल्मी-यारी असावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जी माझ्या संगतीस,कायम वेडी असावी,
जिला माझ्या क्षणांची,आतुर गोडी असावी;
माझ्या जोक्स ला कायम,पुरुषी हसावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

कायम जिने माझी कॉलर,धरूनच असावी,
माझे पसरले केस,ओढूनच असावी;
कधी लाडावून माझी,गळ-मानगूट फासावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

कधी माझ्या न बोलण्याने,विव्हळ असावी,
माझ्या नजरीत ईशार्याला,चपळ असावी;
कुठेतरी या नात्या बद्दल,खूप हळवी असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

कुठे असेल ती,जरा लवकर गवसावी,
तिची प्रफुल्लीत बहर,लवकर बरसावी;
माझ्या शुभ्र आयुष्याला,तिचीच रंगत असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी..

आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी....

No comments:

Post a Comment